कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १३.०७.२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कळमना, नागपूरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा कुख्यात गुंड मुकेश जितलाल पटला वय ३० वर्षे, रा. म्हाडा कॉर्टर नं. २०४, मोनी माता नगर, पासीदास मंदिर जवळ, पो.स्टे. कळमना, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक १३.०७.२००३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. १३,०७,२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. मुकेश जितलाल पटला, याचेविरूद्ध पो.स्टे. कळमना नागपूर शहर येथे कायदयाची मंडळी जमवुन प्राणघातक शस्त्राने खुनाचा प्रयत्न करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, लोक सेवकाने चैतसर जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे, जीवातास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातक कृती करणे, खंडणी करिता एखाद्या व्यक्तीला मृत्युची भीती घालणे, दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, धमकी देणे, मालमत्ता असलेले पात्र अप्रामाणीकपणाने फोडुन उघडणे, चोरी करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, मनाई व हड्डपार आदेशाचे उल्लघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूदचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर स्थान इसमाविरुद्ध गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१४ व २०१८ मध्ये कळमना पोलीसांकडून कलम ११० सी. आर. पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीपण त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने पोलीस उप आयुक्त, परि क ५ नागपूर शहर यांनी २१ वर्षाकरिता हदपार केले होते. त्यानंतर सन २०२३ रोजी कलम ११० (ई) सी.आर.पी.सी. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. स्थानबध्द इसमावर केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अलीकडील काळात त्याने पो.स्टे. कळमना हद्दीत खंडणी करिता एखाद्या व्यक्तीला मृत्युची भीती घालणे, दुखापत करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, धमकी देणे, मालमत्ता असलेले पात्र अप्रामाणीकपणाने फोडुन उपडणे, चोरी करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे मनाई व हड्डपार आदेशाचे उल्लघन करणे, इत्यादी स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नाम मुकेश जितलाल पटोला, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन कळमना, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव तयार केला, त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरुध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देहव्यापार करवुन घेणाऱ्या महिला आरोपीविरूध्द गुन्हा दाखल 

Fri Jul 14 , 2023
– गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभाग यांची कामगीरी  नागपूर :- सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर त्यांना पो. ठाणे हुडकेश्वर हद्दीत तिरूपती रॉवर फ्लॅट नं. ३०४ सर्वश्री नगर बेसा पॉवर हाउस रोड, नागपुर येथे नूतन उर्फ अंजली कालसर्पे नावाची महीला ही स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशाचे आमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करून आणि देहव्यवसायासाठी मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून देवून वेश्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!