सोमवार 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– 27 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज

– 27 पैकी 14 ग्रामपंचायत वर महिला राज

कामठी ता प्र 27 :- कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून सोमवार 28 नोव्हेंबर पासून सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून निवड होणारे 27 सरपंच व 93 सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे.या 27 ग्रामपंचयात निवडणुकीसाठी 34 हजार 674 पुरुष ,33 हजार 509 स्त्री मतदार तसेच 2 तृतीयपंथी मतदार असे एकूण 68 हजार 185 मतदार एकूण 122 मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावनार आहेत अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली.

सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून होणार असून सरपंच पदासाठी ज्यांचा जन्म 1 जानेवारी 1995 अथवा त्यापुढे असेल तर त्यांना सातवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.हे इथं विशेष!

निवडणूक होणाऱ्या या 27 ग्रामपंचायती मध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प अंतर्गत 6 प्रभाग मिळून 17 हजार 485 मतदार आहेत ज्यामध्ये 8 हजार 678 पुरुष तर 8 हजार 806 स्त्री मतदार व एक इतर मतदार आहे. खापा मध्ये 3 प्रभाग मिळून एकूण 1390 मतदार असून 725 पुरुष तर 665 स्त्री मतदार आहेत.गुमथी मध्ये 3 प्रभाग मिळून एकूण 672 मतदार असून 334 पुरुष तर 338 स्त्री मतदार आहेत. सुरादेवी मध्ये 3 प्रभाग मिळून एकूण 1388 मतदार असून 726 पुरुष तर 662 स्त्री मतदार आहेत. बिना येथे 4 प्रभाग मिळून एकूण 2742 मतदार असून 1396 पुरुष तर 1346 स्त्री मतदार आहेत.खैरी गावात 3 प्रभाग मिळून 1935 मतदार आहेत त्यात 970 पुरुष तर 965 स्त्री उमेदवार आहेत.खसाळा येथे 3 प्रभाग मिळून 1035 मतदार आहेत ज्यामध्ये 526 पुरुष तर 509 स्त्री मतदार आहेत,भिलगाव येथे 5 प्रभाग मिळून 6 हजार 302 मतदार आहेत ज्यामध्ये 3 हजार 273 पुरुष तर 3 हजार 29 स्त्री मतदार आहेत.रणाळा ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 5 प्रभाग मिळून 5 हजार 111 मतदार आहेत ज्यामध्ये 2579 पुरुष तर 2531 स्त्री मतदार आहेत.आजनी ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 2260 मतदार आहेत ज्यामध्ये 1128 पुरुष तर 1132 स्त्री मतदारांचा समावेश आहे.गादा ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 1374 मतदार आहेत ज्यामध्ये 686 पुरुष तर 688 स्त्री मतदार आहेत.सोनेगाव ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 1566 मतदार आहेत ज्यामध्ये 811 पुरुष तर 755 स्त्री मतदार आहेत ,आवंढी ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 816 मतदार आहेत ज्यामध्ये 405 पुरुष तर 411 स्त्री मतदार आहेत.भोवरी येथे 3 प्रभाग मिळून 1043 मतदार आहेत ज्यामध्ये 517 पुरुष तर 526 स्त्री मतदार आहेत,गुमथळा ग्रा प अंतर्गत चार प्रभाग मिळून 2708 मतदार आहेत ज्यामध्ये 1404 पुरुष तर 1304 स्त्री मतदार आहेत.वडोदा ग्रा प अंतर्गत पाच प्रभाग मिळून 4703 मतदार आहेत ज्यामध्ये 2478 पुरुष तर 2225 स्त्री मतदार आहेत.जाखेगाव ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 766 मतदार आहेत ज्यामध्ये 408 पुरुष तर 358 स्त्री मतदार आहेत.भुगाव ग्रा प अंतर्गत चार प्रभाग मिळून 3496 मतदार आहेत ज्यामध्ये 1793 पुरुष तर 1703 स्त्री मतदार आहेत.शिवणी ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 687 मतदार आहेत ज्यामध्ये 345 पुरुष तर 342 स्त्री मतदार आहेत.आडका ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 822 मतदार आहेत ज्यामध्ये 434 पुरुष तर 388 स्त्री मतदार आहेत.केम ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 656 मतदार आहेत ज्यामध्ये 334 पुरुष तर 322 स्त्री मतदार आहेत ,दिघोरी ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 1221 मतदार आहेत ज्यामध्ये 608 पुरुष तर 613 स्त्री मतदार आहेत.परसाळ ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 1333 मतदार आहेत ज्यामध्ये 666 पुरुष तर 667 स्त्री मतदार आहेत ,कढोली ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून 1545 मतदार आहेत ज्यामध्ये 802 पुरुष तर 743 स्त्री मतदार आहेत.तरोडी बु येथे 3 प्रभाग मिळून 1387 मतदार आहेत ज्यामध्ये 714 पुरुष तर 673 स्त्री मतदार आहेत ,कापसी बु येथे 3 प्रभाग मिळून 2716 मतदार आहेत ज्यामध्ये 1429 पुरुष तर 1287 स्त्री मतदार आहेत तर लिहिगाव ग्रा प अंतर्गत 3 प्रभाग मिळून एकूण 1 हजार 26 मतदार असून 505 पुरुष तर 521 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर जिल्ह्यात ४ ठिकाणी पर्यटन सुरू होणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ  

Sun Nov 27 , 2022
नागपूर :- संविधान दिनाचे औचित्य साधून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ केला. डॉ बाबासाहेब यांच्या जीवनातील महत्त्वाच्या जागांवर ही पर्यटनाची सुरुवात आहे. नागपूर जिल्ह्यातील चार ठिकाणचे पर्यटन अनुयायांसाठी लवकरच सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन नागपूर यांच्यामार्फत या संदर्भातील एक कार्यक्रम दीक्षाभूमी येथे आयोजित करण्यात आला होता. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com