नागपूर :- पोलीस आयुक्तालयातर्फे ध्वनी प्रदुषणाद्वारे होणारे दुष्परीनाम टाळण्याकरीता दिनांक २०.०५,२०२४ पासुन संपुर्ण नागपूर शहरात “नो हॉकींग” अभियान राबविण्यात येणार आहे. रविन्द्र सिंघल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी आज दिनांक २०.०५.२०२४ चे ११.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत व्हेरायटी चौक येथुन नमुद अभियानाची स्वतः उपस्थित राहुन सुरुवात केली.
नमुद अभियाना दरम्यान नागरीकांनी वाहन बालवितांना हॉर्नचा अनावश्यक वापर करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले. याप्रसंगी उपस्थित सह. पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रमोद शेवाळे, पोलीस उप आयुक्त वाहतुक शाखा शशीकांत सातव, यांनी सुध्दा नागरीकांसोबत संवाद साधुन अपवादात्मक स्थिती सोडुन हार्नचा वापर करून नये व ध्वनी प्रदुषण टाळण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सर्वांनी संदेशात्मक फलक दर्शवून नागरीकांचे लक्ष वेधले. अशाच प्रकारे संविधान चौक व शंकर नगर चौक येथे सुध्दा पोलीस आयुक्त यांनी स्वतः उपस्थित राहुन नागरीकांना हॉर्न फ्री नागपूर चा संदेश दिला.