विवाहित इसमाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जे पी नगर रहिवासी एका विवाहित इसमाने अज्ञात कारणावरून घर मंडळी झोपेत असल्याचे संधी साधून आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव शिलकुमार वासनिक वय 40 वर्षे रा जे पी नगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक इसमाने आज सकाळी उठून घरातील पाणी भरून बाहेरील हॉटेल मधून चहा घेत घरी परतला.दरम्यान घरमंडळी गाढ झोपेत असल्याचे संधी साधून घरातील खोलीत छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहाचे पार्थिव शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहीमेचे यश, संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Jan 22 , 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुर्ला येथील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम मुंबई :- मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहीमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com