ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …शरद पवारांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतून लढण्याचे दिले संकेत…

नाशिककरांनी यशवंतराव चव्हाण यांना अविरत साथ दिली आणि म्हणून इतिहास असलेल्या नाशिकची निवड केली ;शरद पवारांनी सांगितले कारण…

रस्तोरस्ती लोकांचे चेहरे आणि हावभाव बघता मला माझी भूमिका सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर मला पहायला मिळाली…

छगन भुजबळांना येवला मतदारसंघ कसा दिला याचा इतिहासच शरद पवारांनी सांगितला…

केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही…

नाशिक :- नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाव अशी प्रार्थना वरुणराजाकडे केल्याचे माध्यमांना सांगितले.

नाशिकला स्वातंत्र्याच्या इतिहासात वेगळे महत्व आहे. कॉंग्रेस पक्षाचा इतिहास बघितला तर नाशिकला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर अनेक उत्तम मार्गदर्शक या शहरातून उपलब्ध झाले. त्यावेळी आमच्या तरुणांचे सामाजिक व राजकीय आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. चीनचे संकट देशावर आल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी संरक्षण मंत्री म्हणून दिली. चव्हाणसाहेबांचा लोकसभेत प्रवेश हा नाशिकमधून झाला होता. नाशिककरांनी त्यांना अविरत साथ दिली ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात नाशिकमधून करावी वाटल्याने आज दौऱ्याची सुरुवात केल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मी नाशिकला रस्त्यावरून येताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव बघितल्यानंतर आत्मविश्वास वाढला पण त्यापेक्षा माझी भूमिका सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर मला पहायला मिळाली त्याचा मला आनंद झाला असेही शरद पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत आपली आवश्यकता असल्याची इच्छा व्यक्त केली आणि मग नाशिकच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर येवल्यातून निवडणूक लढवावी असे सूचवले. येवला आमच्या विचारांचा तालुका आहे. १९८० साली आम्ही कॉंग्रेसमधून बाहेर पडलो. कॉंग्रेस (एस) पक्ष स्थापन केला. त्यावेळी नाशिककरांनी सर्व जागा आम्हाला निवडून दिल्या. लागोपाठ दोनदा जर्नादन पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे भुजबळ याना सेफ जागा द्यायची होती म्हणून त्या मतदारसंघातील लोकांची संमती घेतली व आम्हाला यश आले असेही छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघ कसा दिला याचा इतिहास शरद पवार यांनी माध्यमांना सांगितला.

वयानुसार थांबले पाहिजे या अजित पवार यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …या ओळीची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

आताच्या मंत्रीमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे ८४ वय होते. वय असते… नाही असे नाही… पण केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेत विश्व पर्यावरण दिवस साजरा

Sat Jul 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या कॉन्वेंट हिंदी प्राइमरी शाळेत विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणूंन छावनी परिषद कामठी चे मनोनीत सदस्य कमल किशोर उर्फ लालू यादव होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला मायकल ,शिक्षक वर्गातील शालिनी नॉर्बर्ट, डोरोथी लॉरेन्स,मारिया मडावी, पूनम यादव, उर्मीला राऊत,बिनीता,राधिका अवस्थी जेस्लिन राजेरिओ,शुभम वैरागडे,रश्मी दुर्गे,नर्गिस बानो,फिलोमिना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com