संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमध्ये बेस्ट मार्केटिंग, नफा, विक्री, वापर व जागरुकता यासारखे क्षेत्रात उद्योजक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कामठी तालुक्यातील आजनी येथील वैशाली ग्रेन्सचे संचालक निरज भगवंतराव रडके यांना दिल्ली येथे बेस्ट उद्योजक म्हणून २०२३ चा “बेस्ट स्टार्टअप ऑफ दी ईयर इन फूड” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज जनमानसात एक धारणा बाळगली जाते की शिक्षण घेऊन नौकरी करायची पण कित्येक तरुण व्यवसायात नशीब आजमावतात ते ही एका छोट्याश्या गावातून असेच काही कामठी तालुक्यातील गुमथळा मार्गावरील आजनी गावातील रहिवासी नीरज भगवंतराव रडके यांनी व्यवसायात पदार्पण केले व फूड क्षेत्रात काम करीत वैशाली ग्रेन्स नावाने फर्म तयार करून यशस्वी उद्योजक म्हणून नाव लौकीक केले. त्यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमध्ये बेस्ट मार्केटिंग , नफा, विक्री, वापर व जागरुकता यासारखे मोजता येण्याजोगे व्यवसाय फायदे वितरीत करणारे विपणन धोरण विकसित करून आणि अंमलात आणण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याने यशस्वी उद्योजक म्हणून नुकतेच निरज रडके यांना दिल्ली येथील अंबियंस कन्व्हेशन हॉटेल येथे १७ जून रोजी आयोजित कार्यक्रमात “बेस्ट स्टार्टअप ऑफ दी ईयर इन फूड” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत देशातील विविध क्षेत्रात उद्योजक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां २५० उद्योजक स्पर्धक सहभागी झाले होते त्यात निरज रडके यांचा सत्कार करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.