गडचिरोली – आमदार डॉ देवरावजी होळी यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी सन २०१४ पासून थकीत असलेला दरमहा रुपये ४ हजार प्रमाणे कमांडो भत्ता देण्याची केली मागणी C-60 कर्मचाऱ्यांप्रमाणेच विशेष कृती दलातील जवानांनाही करावे लागतात जोखमीची कामे
नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी सी-६० व विशेष कृती दल कार्यरत आहेत.मात्र सी-६० जवानांना ज्याप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता देण्यात येतो त्याप्रमाणे विशेष कृती दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना दिला जात नाही . त्यामुळे त्यांनाही सी -६० जवानाप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता २०१४ पासूनच्या थकबाकीसह देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.*
विशेष कृती दलाचे मुख्यालय नागपूर येथे असून कार्यरत कर्मचारी यांची नियुक्ती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी करण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सध्या मिळणार्या प्रवास भत्ता हा त्यांचे साप्ताहिक सुट्टी व रजेचे दिवस भरून देण्यात येतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमी मासिक रुपये ३ हजार न मिळता कर्तव्यावर जेवढे दिवस असतात तेवढ्याच दिवसाचा प्रवास भत्ता मिळतो
सी-६० जवानांप्रमाणे विशेष कृती दलातील जवानांनाही अती दुर्गम नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद विरोधी जोखमीची कामे करावी लागतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सी-६० दलातील जवानांना ४ हजार रुपये कमांडो भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे या जवानांनाही कमांडो भत्ता २०१४ पासुनच्या थकबाकीसह देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली
सतीश कुमार गडचिरोली