नागपूर :- पोलीस ठाणे सायबर नागपुर शहर अप.क्र. ८६/२०२३ फिर्यादी विनोद महोदेवराव कडू रा. महेश टॅव्हल्स जवळ, गिरीपेठ, नागपूर यांना आरोपीताने Amitesh kumar या नावाने फेसबुकवर फेंड रिक्वेस्ट पाठविली व फेसबुक अकाउंटच्या मेसेंजरवरून चॅटींग केली. व फिर्यादीचे व्हाटसअपवर अमितेश कुमार यांचा मित्र संतोष कुमार सीआरपीएफ ऑफीसर असल्याचे भासवून बदली झाल्याने त्यांचे घरातील साहीत्य फिज, वॉशिंग मशीन, एसी, इत्यादी विक्री करणे असल्याचे कळवून कमी किंमत सांगितली. आरोपीताने पाठविलेल्या बिलावर भारतीय राजमुद्रा असलेला लोगो, सीआरपीएफ चा लोगोचा वापर केला होता. फिर्यादीने कमी किमतीत सामान विकत घेण्याकरीता २४,०००/- चा ऑनलाईन व्यवहार केला. परंतु फिर्यादींना साहित्य दिले नाही तसेच फिर्यादीने पाठविलेले पैसे सुध्दा परत न करता फिर्यादीची फसवणुक केल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून सपोनि मारुती शेळके यांनी अप.क्र. ८६/२०२३ कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ३४ भादंवि सहकलम ६६ (सी), ६६(डी) आय टी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद केला आणि आरोपीतांचे बँक खाते तात्काळ फिज केले.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपीचे बँक खात्याची माहीती प्राप्त करून पोलीस पथकाने तांत्रीक विश्लेषणाचे आधारे कौशल्याने तपास करुन अल्वर राजस्थान येथून आरोपी नामे १) सुरेंद्र प्रितम सिंह वय २८ वर्षे, रा. गांव कुशाल बास, तहसील मुण्डावर जिल्हा अलवर, पोलीस ठाणे चौराह ततारपुर, राजस्थान २) तौफिक खान फतेह नसिब खान वय २५ वर्षे रा. गांव नागालिया, तहसील किसनगढ़ बाज जिल्हा अलवर, पोलीस ठाणे किसनगढ़ बाज, राजस्थान ३) संपतराम श्रीबंसीलाल प्रजापत वय ३३ वर्षे, रा. गांव ककराली मेव, तहसील अलवर जिल्हा अलवर, पोलीस ठाणे सदर, राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे व सायबर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याची तपास टीम सपोनि संदिप बागुल,पोउपनि विवेकानंद औटी, रंजित गवई, तुषार तिडके, अजय पवार, योगेश काकड यांनी केलेली आहे.
सदर गुन्हयांतील आरोपीतांचे वेगवेगळ्या बँकेचे बँक खात्याची माहीती प्राप्त करून १,२३,०१२/- रु रक्कम फ्रिज करण्यात आली असुन आरोपींकडून चार मोबाईल आणि गुन्हयात वापरण्यात आलेल्या बँक खात्याचा बेअरर चेक जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हा सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस करीत आहेत.