संदीप कांबळे ,कामठी
कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील हॉटेल मिठठूलाल जवळील दुकानाच्या मागील दार तोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानात ठेवलेले एअर कॉम्प्रेसर, पोकलॅण्ड मशीन चा बूम सिलेंडर, तसेच दुकानातील लोहे चे पट्टे असा एकूण 50 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे चोरी झाल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी हिजबुल रहमान खलील उल रहमान वय 65 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 380, 461 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.