नवोदय जनोत्थान संघटन कन्हान व्दारे शहीद दिवसा निमित्त शहीदांचे स्मरण करण्यात आले 

कन्हान : –  २३ मार्च शहीद दिवसा निमित्य नवोदय जनोत्थान संघटन कन्हान व्दारे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान-कांद्री येथे शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पु्ष्पहार अर्पण करित अभिवादन करून स्मरण करण्यात आले.
          बुधवार (दि.२३) मार्च २०२२ ला नवोदय जनो त्थान संघटन कन्हान व्दारे इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान-कांद्री येथे शहीद भगतसिंह, राजगुरू , सुखदेव यांच्या प्रतिमेला संघटन अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण कार्यक्रमाची सुरू वात करण्यात आली. शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना उपस्थित सर्व पदाधिका-यांनी पुष्प अर्पित व अभिवादन करून स्मरण करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, कोषाध्यक्ष सतीश उके, गहुहिवरा ग्राम पंचायत सदस्य निखिल पाटिल, वस्तिगृह अधिक्षक व संघटन सदस्य मनिष शंभरकर यांनी शहीद विरांच्या जिवनावर विध्या र्थांना इतिहासावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिव प्रदिप बावने यांनी तर आभार सोनु खोब्रागडे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अभिजित चांदुरकर, गौरव कुर्वे, प्रविण माने, प्रकाश कुर्वे आदीने सहकार्य केले. यावेळी वस्तिगृहाचे विध्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

"शहीद दिवस" के अवसर पर WCL ने NMC के स्कूलों को आरओ वितरित किये

Thu Mar 24 , 2022
नागपुर – “आजादी के अमृतमहोत्सव” के आलोक में आज 23 मार्च “शहीद दिवस” के अवसर पर WCL ने NMC के 75  स्कूलों को सीएसआर के तहत 75 आरओ प्यूरीफायर वितरण किये जाने की श्रृंखला में आज 15 आरओ प्यूरीफायर विभिन्न स्कूलों के प्राचार्यों को प्रदान किये। वेकोलि मुख्यालय में आयोजित इस कार्यक्रम में अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक मनोज कुमार मुख्य अतिथि और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com