संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी मार्गे सहा चाकी आयसर ने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर वाहनाने कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या 23 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही मध्यरात्री 4 दरम्यान केली असून या धाडीतून जप्त केलेले सहाचाकी आयसर किमती 10 लक्ष रुपये व एकूण 23 गोवंश जनावरे किमती 5 लक्ष 75 हजार रुपये असा एकूण 15 लक्ष 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तीन आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
अटक तीन आरोपीमध्ये संदीप वैद्य वय 27 वर्षे रा रजेगाव जिल्हा बालाघाट,सूचित गडपायले वय 33 वर्षे रा बाजार टोला,जिल्हा गोंदिया,शाहरुख सलीम खान वय 25 वर्षे रा चँगैरा गोंदिया असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नलवाडे यांच्या मार्गदर्शनार्थ ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर ,पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या नेतृत्वात डी बी स्कॉड च संदीप सदने,संदेश शुक्ला , कमल कनोजिया, अनिकेत सांगळे, सुरेंद्र शेंडे ,संजीव उपाध्याय, नरेश खडकबांध यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.