महावितरणच्या सावनेर विभागात महिलादिनी

थकबाकी भरणाऱ्या शेतकरी महिलेचा सन्मान
सावनेर दि. ८ मार्च २०२२ : महिला दिनानिमित्त कृषी पंपाची वीज बिलाची थकबाकी भरणाऱ्या  शेतकरी महिलेचा  महावितरणच्या सावनेर विभागातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी सन्मान करून या शेतकरी महिलेला महिलादिनानिमित्त सुखद क्षणांची अनोखी भेट दिली. विशेष म्हणजे,सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार या महिला असतानाही जोखिमेच्या वीज  वितरण क्षेत्रात प्रभावीरित्या कार्यरत असून त्यांनी या उपक्रमाचे आवर्जून कौतुक केले आहे.
महिला दिनानिमित्त  संपूर्ण जगात महिलांच्या सर्वच क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची नोंद घेऊन त्यांचा ८ मार्चला सन्मान करण्यात येतो. महावितरणच्या सावनेर विभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी या दिनाचे औचित्य साधून कृषी पंपाच्या वीज बिलाची  ४७,००० रुपयांची थकबाकी भरणाऱ्या रमा खडसे या शेतकरी महिलेचा कार्यालयात सत्कार केला. याप्रसंगी उप कार्यकारी अभियंता स्वाती पडलमवार,अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रीती बन्सोड,स्मिता नकटे,कनिष्ठ अभियंता निकिता ठाकरे,सहाय्यक लेखापाल अलका गोखले,कनिष्ठ लिपिक लता मेश्राम,शारदा सोंडबारसे, प्रधान तंत्रंद्य मंजुषा कडू,वरिष्ठ तंत्रंद्य मीनाक्षी मोहणकर तसेच पल्लवी जोग या महिला कर्मचाऱ्यांनी महिला शेतकऱ्याचा सत्कार केला. याप्रसंगी शेतकरी महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा देताना कृषी योजनेत सहभाग नोंदविल्याबद्ल या शेतकरी महिलेला महावितरणच्या  कर्मचारी महिलांनी धन्यवादही दिले.
वीज वितरण सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात २४ x ७ कार्यरत महिला अभियंते,अधिकारी,कर्मचारी यांच्या योगदानाची प्रशंसा करताना सावनेर विभागातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी महिला शेतकऱ्याचा सन्मान केला, त्याबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी शेतकरी महिलेला धन्यवाद देऊन या उपक्रमाबद्दल महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. नागपूर परिमंडल कार्यालयातही महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षते खाली आयोजित कार्यक्रमात कार्यालयातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पाली व बौद्ध अध्ययन विभागात महिला दिन 

Tue Mar 8 , 2022
नागपुर – 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातील शिक्षक-शिक्षकेतर महिलांचा विद्यार्थी व विभागाच्या वतीने पुष्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे विभाग प्रमुख प्रा डॉ नीरज बोधी यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे  यांनी पालीच्या प्राध्यापिका डॉ तुळसा डोंगरे, प्राध्यापिका डॉ कुमुद मेश्राम, प्राध्यापिका डॉ ज्वाला डोहाणे, प्राध्यापिका वसुंधरा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com