संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठीतील सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व एन सी सी च्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मोठया थाटात साजरी करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हान तर मुख्य वक्ते म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. इफ्तेखार हुसैन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वांनी सरदार पटेल यांच्या फोटोवर पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ विनोद शेंडे यांनी केले. प्रास्तविक भाषणानंतर डॉ. शेंडे यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथेचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यानी सुद्धा त्याची पुनरावृत्ती करत शपाथेचे वाचन केले. डॉ इफ्तेखार हुसैन यानी त्यांच्या भाषणात राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व सांगत सरदार पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ विनय चव्हान भारत देश एक अखंड भारत कसा झाला यावर आपले विचार मांडले. शिवाय सर्वांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन पण केले. मुख्य कार्यक्रमानंतर रन फॉर युनिटी मेरोथोन आयोजीत करण्यात आली. कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. निषिता अंबादे, डॉ. सतिश डूडूरे, डॉ. तुषार चौधरी, डॉ . गिझाला हाशमी, डॉ. शालिनी चाहांदे, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. दुर्गा पांडे, डॉ. महेश जोगी, डॉ. समृध्दी टापरे, डॉ. मंजिरी नागमोते, पी.के. शिंगणे, मृणाली कुथे आणि डॉ. मोनिका मानापुरे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे व एन सी सी चे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनोद शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निषिता अंबादे यानी केले.