संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालय व विद्यापीठे यांचे नॅशनल इंस्टिट्युट रॅंकींग फ्रेमवर्क तर्फे इंडीया रॅंकींग ठरविण्यात येते. यावर्षी दिनांक ५ जून २०२३ सोमवार ला शिक्षण मंत्रालयाद्वारे घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रॅंकींग २०२३ मध्ये विदर्भातील खाजगी फार्मसी महाविद्यालयातून नामांकित महाविद्यालयामध्ये श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी या एकमेव महाविद्यालयाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे मागील सतत ७ वर्षापासून कायम हा बहुमान प्राप्त करणारे कामठी फार्मसी महाविद्यालय एकमेव ठरलेले आहे.
मध्य भारतातील औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रात अग्रगण्य असलेले श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी हे महाविद्यालय शैक्षणिक तसेच संशोधनात्मक कार्याकरीता एक नामांकीत संस्था असुन संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याात NBA, NAAC तसेच NIRF असलेले एकमेव महाविद्यालय आहे.
यावर्षी नॅशनल इंस्टिट्युट रॅंकींग फ्रेमवर्क तर्फे देशातील सर्व विद्यापीठ तसेच अभियांत्रीकी, व्यवस्थापन व औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचे रॅंकींग ठरविण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठ व महाविद्यालयांचा रॅंकींग ठरवितांनी शैक्षणिक, संशोधन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, रोजगाराच्या संधी, जनसामान्यांचे मत इत्यादी घटकांच्या समावेश करण्यात आला.
सोमवारी दुपारी जाहिर झालेल्या यादीत संपूर्ण भारतातील विविध विद्याशाखेतून नामांकिंत महाविद्यालयांची निवड यादी घोषित करण्यात आली. सदर यादीत भारतातून औषधीनिर्माणशास्त्र शाखेत श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी ने ६८ वे स्थान पटकाविले असून संपूर्ण विदर्भातून खाजगी फार्मसी महाविद्यालयांमध्ये एकमेव नामांकित राहण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
कामठी फार्मसी महाविद्यालयाने अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्यल प्राचार्य डॉ मिलींद उमेकर यांनी आनंद व्यक्त केला. याकरीता संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेश भोयर यांच्या योग्य मार्गदर्शनात महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे विषेश आभार व्यक्त केले.
याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगती, संशोधन व रोजगाराच्या संधीबद्यल महाविद्यालयाला मागील ७ वर्षापासून श्रेणी प्राप्त कायम असलेले एकमेव महाविद्यालय असल्याचे सांगीतले. या यशस्वीतेकरीता महाविद्यालयाचे रॅंकींग प्रकल्पाचे संयोजक डॉ ब्रिजेश ताकसांडे, सर्व प्राध्यापक वृंद तसेच पालक आणि विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलींद उमेकर यांनी अभिनंदन केले.