सोनेगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३मध्ये घेण्यात आलेल्या १० वी च्या परीक्षेत आयुध निर्माण अंबाझरी, नागपूर येथील राष्ट्रीय माध्यमिक हिंदी विद्यालय आणि धरमपेठ इंग्रजी माध्यम शाळा व ज्युनिअर कॉलेजचा निकाल १००% लागला. राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयाच्या राधाकुमारी शर्मा, रुकसार मन्सुरी व राजु मौर्य या विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे श्रमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनोहर आखरे, उपाध्यक्ष महादेव भडांगे ,सचिव सत्येंद्र प्रसाद, प्रभारी मुख्याध्यापिका अर्चना कोसे, ऋषिकुमार वाघ ,आनंद नंदनवार आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले .परिसरातील धरमपेठ इंग्रजी शाळेतून अंजली टापरे प्रथम आली. तिला ८८.६०% गुण प्राप्त झाले. द्वितीय प्रियांशी मुन आली असून तिला ८६ % गुण मिळाले तर समृध्दी डुकरे हिने ८४.८० % गुण घेऊन तृतीय स्थान पटकाविले.
या यशाबद्दल धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, उपाध्यक्ष रत्नाकर केकतपूरे, सचिव मंगेश फाटक, सहसचिव दिपक दुधाने, प्राचार्य विजय मुंगाटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.