– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे विमा प्रमाणपत्राचे वाटप
– विभागीय बैठकीतही होणार विचारमंथन
सांगली :- पत्रकारांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा सांगली जिल्हा कौटुंबिक स्नेहसोहळा रविवार, २८ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सांगली येथेच हा कार्यक्रम थाटात आयोजित करण्यात आला आहे.
हरीपूर येथील गणपती मंदिरासमोर असलेल्या शिवपार्वती लॉनमागील विराज लॉन येथे आयोजित या कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता होणार आहे. सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा अध्यक्ष संदीप काळे, सांगली महापालिकेचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, महापालिकेच्या सभागृह नेत्या भारती दिगडे, स्वदेशी ग्रुपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारांचा विमा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय उपस्थित मान्यवर पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन सत्रानंतर खेळ पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आला आहे. कौटुंबिक स्नेहसोहळ्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठकही होणार असल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सांगली जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी दिली. कौटुंबिक स्नेहसोहळा कार्यक्रमाला पत्रकारांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.
पत्रकार क्रांतीचा सूर्य पश्चिममेतूनही उगवेल
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून देशभरातील पत्रकारांची संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली आहे. असे म्हणतात सूर्य कधी पश्चिमेतून उगवत नाही. परंतु महाराष्ट्रातील पत्रकारांचे संघटन बघता राज्याच्या पश्चिमेतूनही पत्रकारांच्या क्रांतीचा सूर्य उगवेल असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
– संदीप काळे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया
पत्रकार, पत्रकारितेचे दिवस बदलणार
पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे आगामी काळात पत्रकार आणि पत्रकारितेचे दिवस निश्चितच बदलणार यात शंकाच नाही. राष्ट्रीयपासून तर तालुका कार्यकारिणीपर्यंत सर्व पदाधिकारी हे कार्य एक व्रत म्हणून स्वीकारले आहे.
सचिन मोहिते,सांगली जिल्हाध्यक्ष