सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत गांधी चौक सावनेर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी १०.०० वा. ते ११.१५ वाजता पर्यंत वाहतूक सप्ताह निमित्त सेंट थॉमस स्कूल घोराड कळमेश्वर येथील शाळेने विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमाचे जनजागृती करिता हेल्मेटचा वापर करावा, सीटबेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे यावर पटनाट्य सादर केले.
अनिल मस्के भापोसे सहाय्यक पोलीस अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, रवींद्र मानकर, पोलीस निरीक्षक सावनेर, विकी लोखंडे पोलीस उपनिरीक्षक, सिजो मंधीयू सचिव, बेस्टीमोल सिनो मॅथ्यू मॅनेजर, शितल भंडारे प्राचार्य, ब्राझील बेंजमन उप प्राचार्य, पोलीस हवालदार सुनिल तळमले, पोलीस शिपाई अंकुश शास्त्री, विशाल बडदे, अतुल खोडणकर, सुरेंद्र वासनिक, रवींद्र लेंडे, ज्योती नेवारे हजर होते.
तसेच कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत आज १२.०० वा. ते १२.४५ वा. पावेतो सेंट थॉमस स्कूल यांचे शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तळयाची पार येथे हेल्मेट, सीट बेल्ट, रश ड्रायव्हिंग वाचत पथ नाट्य सादर करून जनजागृती केली आहे. यावेळी पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार श्री. यशवंत सोळसे व इतर स्टाफ हजर होते.