डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्हीएसपीएम एमडीआयएनईने केलेल्या उपक्रमाचे केले कौतुक.
डॉ. आयुश्री आशिष र. देशमुख यांनी भविष्यातसुद्धा सर्व प्रकारची मदत करण्याचे दिले आश्वासन.
नागपूर :- व्हीएसपीएम माधुरीबाई देशमुख इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (VSPM MDINE) द्वारे 30 आणि 31 जानेवारी 2023 ला डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे ‘पाथवेज ट्रान्सफॉर्मिंग नर्सिंग फ्युचर’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्र-कुलगुरू आणि सल्लागार, सावंगी-मेघे हे प्रमुख पाहुणे होते आणि डॉ. आयुश्री आशिष देशमुख या कार्यक्रमाच्या अतिथी होत्या.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले की, आरोग्य सेवा प्रदान प्रणाली प्रभावी होणे गरजेचे आहे. हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये नर्सिंग केअरला खूप महत्त्व आहे. परीचारीकांशिवाय आरोग्यसेवा अपूर्ण आहे. त्यांनी सर्व परिचारिकांना त्यांची भूमिका शिस्तीत आणि समर्पणाने पार पाडण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यांना परिचारिका व्यवसायात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी परिषदेच्या घोषवाक्याचे अनावरण केले. VSPM MDINE च्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
परिषदेला संबोधित करताना, अतिथी डॉ. आयुश्री आशिष देशमुख म्हणाल्या, “आजच्या वाढत्या आणि गुंतागुंतीच्या आरोग्य सेवेच्या वातावरणात, जिथे नर्सिंग व्यवसायाला खूप मागणी आहे, अशा परिषदांमुळे व्यावसायिक विकास आणि करिअर वाढीला मदत होते आणि भविष्यातील क्षेत्रांबाबत परिचारिकांमध्ये जागरुकता निर्माण होते. नर्सिंग व्यवसाय आणि नर्सिंग केअर हा आरोग्यसेवा उद्योगाचा कणा आहे. जागतिक दर्जाच्या काळजीच्या हितासाठी अशा प्रकारच्या परिषदा आवश्यक आहेत. त्यांनी परिषदेचे कौतुक केले आणि नर्सिंग करिअरच्या हितासाठी भविष्यातसुद्धा सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या परिषदेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने निधी दिला होता. त्यांचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र कोलते, प्राचार्य, झाडे कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर, डॉ. भाऊसाहेब भोगे (संस्थापक, व्हीएसपीएमएएचई), युवराज चालखोर (सचिव, व्हीएसपीएमएएचई), डॉ. विलास ठोंबरे (उप-अधिष्ठाता, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. उषा रडके (उप-अधिष्ठाता, व्हीएसपीएम दंत महाविद्यालय) व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला 236 जणांनी भाग घेतला.
प्रास्ताविक डॉ. आम्रपाली गजभिये, व्हीएसपीएम एमडीआयएनई, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूरच्या प्राचार्या आणि प्राध्यापिका यांनी संबोधित केले. एमएसएन विभागप्रमुख प्रा.लता सुकारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन बिन्सी के.पी. यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक दीपप्रज्वलनाने झाली.