मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी
कन्हान :- नांदगाव-बखारी येथील बंद राख तलावाच्या जागेवर सौलर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देऊन व वराडा, एसंबा येथील कोल वॉसरीच्या कोळसा धुळीने त्रस्त गावकरी शेतक-यांना प्रदुषनापासुन मुक्त करेपर्यंत लढा लढणार.सोमवार (दि २२) मे ला सायंकाळी ४.३० वाजता युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हयानी नांदगाव ला भेट देऊन नांदगाव, बखारीच्या गावक-याशी सुसंवाद साधुन राखेच्या तलावामुळे शेती, पेंच नदी, पाणी प्रदुर्षित झाल्याने मंत्री असताना गावक-याच्या मागणीनुसार राख तलाव बंद करून तेथील संपुर्ण राख काढुन राखेच्या प्रदुषना पासुन मुक्त केले. परंतु हे सरकार पुन्हा हा राख तलाव सुरू करू नये व करायचे झाल्यास या बंद राख तलावाच्या २६३ हेक्टर म्हणजे ६५७.५ एकर जागेवर सौलर उर्जा निर्मिती प्रकल्प करून प्रदुषण मक्त गावक-यांना रोजगार उपलब्ध करण्यात यावा.
शेती संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना नौकरी व त्यांचा मोहबदला अद्याप न दिलेल्याना देण्यात यावा. तसेच एसंबा येथील गुप्ता वॉसरी च्या कोळसा धुळीच्या प्रदुर्षणा वराडा, एसंबा व वाघोली च्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन सुध्दा फक्त वॉसरीला लागुन मोजक्या शेतक-यांना तुटपुजे नुकसान दिले.वॉसरी च्या ३ कि मी च्या शेतक-यांना व गावक-याना कोळसा धुळी जमिन, शेती, नाले व पिण्याचे पाणी प्रदुर्षित होऊन गावकरी शेतक-यांच्या आरोग्यावर दुषपरिणाम होत असल्याने ही कोल वॉसरी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत म्हटले की, नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा, वाघोली च्या गावकरी शेतक-यांना या राख व कोळसा धुळीच्या प्रदुर्षना मोठा फटका बसुन आपण त्रस्त असल्याने मी आपल्या भविष्याच्या दुष्टीने या शेतशिवाराकील कोल वॉसरी बंद करेपर्यंत आणि या प्रदुर्षना पासुन मुक्त करण्याकरिता लढा लढुन येणा-या अधिवेशनात प्रश्न लावुन धरून आपणास न्याय मिळवुन दिल्या शिवाय गप्प बसणार नाही.
याप्रसंगी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हा देवेंद्र गोडबोले, राधेश्याम हटवार, रामटेक विधानसभा संघटक विशाल बरबटे, शिवसेना पारशिवनी प्रमुख कैलास खंडार, लोकेश बावनकर, नगरसेविका मोनिका पौनिकर, नांदगाव सरपंच मिलींद देशभ्रतार, बखारी सरपंच पुष्पा ढोणे, माजी जि प अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती मंगला निंबोणे, उपसभापती करूणा भोवते, वराडा सरपंच विद्या चिखले, माजी उपसभापती देवाजी शेळकी, सिताराम भारव्दाज (पटेल) आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आकाश रच्छोरे, वनदेव वडे, धर्मेंद्र रच्छौरे, तुषार ठाकरे, क्रिष्णा खिळेकर, सुरज काळे, संजय टाले सह शिवसेना, युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्राप सदस्य, ग्रामस्थानी सहकार्य केले.