संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार ,राजपत्रित वर्ग -2हे अत्यंत महत्वाचे पद आहे परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 नसल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनांनी यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही त्यामुळे कामठी तहसील कार्यालय चे नायब तहसीलदार संघटना यासह नागपूर जिल्हा नायब तहसीलदार संघटना आक्रमक झाली असून येत्या 3 एप्रिल पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन पुकारण्याचा ईशारा निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आला.
13 मार्च रोजी एक दिवसीय रजा घेऊन सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करीत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येईल व 3 एप्रिल पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन करण्यात येईल.
नागपूर जिल्हा नायब तहसीलदार संघटना ने नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याच्या अनुषंगाने के. पी.बक्षी यांचे अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती(बक्षी समिती)समक्ष सादर केलेल्या सादरी करणात नमूद केलेल्या बाबींच्या अनुशंगाने तसेच यापूर्वी देण्यात आलेले निवेदनावर तात्काळ निर्गमित कार्यवाही करून सदरची मागणी मान्य करून त्या संदर्भातील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे अशी मागणी करण्यात आली आहे तर यासंदर्भात मागणी पूर्ण न झाल्यास 3 एप्रिल पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा नागपूर जिल्हा नायब तहसीलदार संघटनेने दिलेल्या सामूहिक निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना कामठी चे नायब तहसीलदार राजीव ब्रह्मनोटे, नायब तहसीलदार अमर हांडा, तसेच अरुण भुरे, विवेक राठोड, सूर्यभान खोरगडे, रवींद्र खोब्रागडे, आभा वाघमारे, संजय अनवाने, प्रज्ञा केदार, प्रफुल साखरकर,प्रतिमा लोखंडे, सत्यजित भोतमांगे आदी उपस्थित होते.