नागपूर :- नागपूर ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या किल्ले कोलार येथे सुमारे ११ हजार खाजगी गणपतीचे विसर्जन यावेळी होणार असुन तसेच नांदाफाटा कोराडी येथील कृत्रिम तलाव येथे जवळपास १५०० सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण येथील सार्वजनिक व खाजगी गणपतीचे या दोन्ही ठिकाणी विसर्जन होणार आहे.
दिनांक १३/०९/२०२३ रोजी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार (भा. पो. से.) यांनी दोन्ही विसर्जस्थळाची पाहणी करून तसेच चोख बंदोबस्त लावण्यासंबंधी आढावा घेतला. कोलार नदी किल्ले कोलार विसर्जनस्थळ येथील पाहणी करून बंदोवस्त संबंधाने नियोजन आखण्यात आले.