नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी 4.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.
प्रशासनाच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. आगमनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, शहर भाजपा अध्यक्ष बंटी कुकड़े,आ. सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते,मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यावेळी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने त्यांनी यवतमाळकडे प्रयाण केले.