नागपूर :- सन २०२३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक १९/०९/२०२३ रोजी पासुन मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडुन सार्वजनिक गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा होण्याकरीता पुर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर ग्रामीण जिल्हयात २२ मार्च वेगवेगळया ठिकाणी काढण्यात आले असुन मॉब ड्रील देखील घेण्यात आली असुन सर्व समाजाने शांतता व एकात्मतेने उत्सव साजरा करण्याकरीता पोलीस स्टेशन स्तरावर ४५ शांतता कमिटीच्या सभा घेण्यात आल्या त्याच बरोबर डीजे वादयाचा अतिरेक होणार नाही याबाबत त्यांना सुचना दिल्या असून डीजे वादयाचा अतिरेक झाला तर यासाठी ध्वनीमापक यंत्र कॅलीब्रेट केले असून गणपतीचे ज्या मार्गाने विसर्जन होणार आहे अशा सर्व मार्गाचे सबंधित शासकीय विभागा सोबत निरीक्षण करून त्याचे निरसन केले आहे. पोलीस स्टेशन स्तरावर मुस्लीम बांधव व हिंदु बांधवाचे मिटींग घेवुन त्यांचे मतैक्य करून गणपतीचे विसर्जन दिनांक २८/०९/२०२३ व ३०/०९/२०२३ रोजी होणार असुन ईद ए मिलाद हा सण दिनांक २९/०९/२०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
दोन्ही उत्सव एकाच दिवशी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व तसेच एकमेकास सहकार्य करून दोन्ही उत्सव शांततेत पार पडतील याकरीता प्रयत्न केले आहेत. नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना समन्स वॉरेंटचा स्पेशल ड्राईव्ह देवुन त्यांचेवर प्रतिबंधित कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंध घालण्याकरीता फौजदारी प्रक्रीया संहीताच्या कलम १०७ नुसार १५९ गुन्हेगारांवर कलम ११० नुसार ४२ गुन्हेगारांकडुन शांतता राखण्याकरीता बंधपत्र घेण्यात आले असून त्याचबरोबर कलम १४९ नुसार ४५० लोकांना उत्सवामध्ये कोणतीही बाधा उत्पन्न करणार नाही याबाबत नोटीस दिली आहे. गणपती उत्सवाच्या कालावधीमध्ये कोणताही व्यक्ती अवैधपणे दारू विक्री करणार नाही तसेच यामुळे कुणीही दारू पिवुन सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होणार नाही याकरीता महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९३ नुसार ५९ लोकांकडुन चांगली वर्तणुकीसाठी बंधपत्र घेण्यात आले असुन वरील सर्व बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्यान्विरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची समज दिलेली असून प्रत्येक पोलीस स्टेशन मधील टॉप १० सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर बारकाईने लक्ष असून जे गुन्हेगार प्रतिबंधक कारवाईला जुमानत नाहीत त्यापैकी १२ आरोपीला हद्दपार व ०८ आरोपीला एम. पी. डी. ए कायदयांतर्गत स्थानबद्ध करण्याची कार्यवाही प्रस्तावीत केली आहे. तसेच नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी जिल्हयामध्ये २० ठिकाणी कोबींग ऑपरेशन आयोजित केले होते तसेच पुढील काळामध्ये दारू विक्री होणार नाही व त्यांचा कुणीही साठा करून ठेवणार नाही याकरीता नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडुन दारूचे एकुण १६३ दारू विक्री करणान्यावर केसेस केलेले असुन व सर्व विदेशी दारूची दुकाने, परमिटरूम व बिअरबार हे अस्थापना शासनाने निर्धारीत केलेल्या वेळेत बंद होतील याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
सार्वजनिक गणपती उत्सव शांततेत पार पाडावा त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असावे याकरीता ज्या अधिकारी व अंमलदार यांनी ज्या रजा घेतल्या व जे वैद्यकीय रजेवर आहेत अशा सर्व अधिकारी व अंमलदारांना तात्काळ हजर होण्याचे आदेश दिले असुन त्यांना तात्काळ हजर होणेकरीता मुंबई पोलीस कायदा कलम १४५ नुसार नोटीस दिलेले आहेत. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस दलामध्ये २२०० इतके अधिकारी व अंमलदार पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झालेले असुन त्यामध्ये प्रत्येक प्रभारी बीट अधिकारी व अंमलदारांना रजिस्टर गणपती मंडळ दत्तक म्हणुन दिलेले आहे. त्यामुळे सदर मंडळावर बारकाईने व जवळुन लक्ष ठेवणे सोपे पडणार आहे.
त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस बल याची एक कंपनी व ८५० होमगार्ड उपलब्ध असल्यामुळे सदरचा उत्सव शांततेत पार पाडण्या इतपत मनुष्यबळ उपलब्ध असून राज्य राखीव पोलीस बल यांची राहण्याची सोय पोलीस स्टेशन रामटेक, खापरखेडा, उमरेड येथे केली आहे. त्याचबरोबर बंदोबस्तामध्ये उपलब्ध असलेले सर्व अधिकारी, अंमलदार, होमगार्ड व राज्य राखीव पोलीस बल (SRPF) यांना जेवणाकरीता फुड पॅकेटची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक गणपती उत्सव मध्ये कोणताही अनुचित किवा घातपाताचा प्रकार होऊ नये म्हणून घातपात विरोधी पथक (BDDS) ने जिल्हयातील गर्दीचे ठिकाण रेल्वे स्टेशन, बस स्टैंड, थर्मल पावर स्टेशन अशा ठिकाणी तपासणी केली असून या कालावधी मध्ये कुठल्याही व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर केली तर त्यासंबंधाने सोशल मिडीया सेलने अशा लोकांवर विशेष लक्ष ठेवण्याकरीता टुल उपलब्ध करून लक्ष ठेवण्यात येत आहे. बंदोबस्ताची पूर्वतयारी म्हणून दहशतवादी विरोध कक्ष (ATC) नागपूर ग्रामीण जिल्हयात मज्जिद, आकाशवाणी केंद्र, रेल्वे स्टेशन मुख्य ठिकाणी फार्म हाउस, लॉजेस झोपडपट्टी परीसर, मॉजीन हाउस व इतर महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी केलेली आहे. सर्वसामान्य नागरीकांकडुन जबरदस्तीने वर्गणी गोळा करण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्या मंडळावर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व मंडळाला व नागरीकांना सुचना दिल्या आहेत. या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी गुड मॉर्निंग स्कॉडसाठी पोलीस स्टेशन मधुन अधिकान्याची नेमणुक केलेली आहे. सार्वजनिक गणपती उत्सवाच्या कालावधीमध्ये व विसर्जनाच्या दिवशी नागरीकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याकरीता व्हिडीओग्राफी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती विसर्जन स्थावर सी. सी. टी. व्ही कॅमेरेची व्यवस्था केली असून विसर्जना दरम्यान जे कोणी उल्लडबाजी किंवा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर त्वरीत प्रतिबंध घालता येईल, त्याचबरोबर विसर्जन स्थळी लाईफ गार्ड दिलेले असुन विसर्जनाच्या वेळी व दुसन्या दिवशी विसर्जन केलेल्या मुर्तीचे अवशेष हटविण्याकरीता व्यवस्था केलेली आहे.
तरी दोन्ही सण उत्सव शांततेत पार पडण्याकरीता वरील सर्व सुचना व त्याची अंमलबजावणी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली केली असुन पोलीस अधीक्षक यांनी रामटेक व उमरेड या ठिकाणी स्वतः सर्व घटकाच्या बैठका घेवुन महत्त्वाच्या विसर्जन स्थळावर भेट देवुन पाहणी करून सुचना दिल्या व मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी देखील बुट्टीबोरी, सावनेर या ठिकाणी सर्व घटकाच्या बैठका घेवुन मार्गदर्शन केले.