– पोलीस सहआयुक्त अश्वती दोर्जे ह्यांच्या हस्ते प्रगती पाटील सन्मानित
– महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर :- महिला दिनानिमित्य महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, च्या वतीने प्रगती पाटील,भारतीय जनता पार्टी च्या महिला आघाडी प्रमुख ह्यांना अश्वती दोर्जे, सह आयुक्त नागपूर पोलीस ह्यांच्या हस्ते `सन्मान स्त्रीशक्तीचा` ने सन्मानित करण्यात आले.
पाटील यांनी पर्यटन, पर्यावरण व सामाजीज क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सह आयुक्त अश्वती दोर्जे ह्यांनी प्रगती पाटील यांनी नेहमीच महिलांना सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्या सातत्याने फक्त महिलाच नवे तर समाजातील प्रत्येक घटकातील जनतेसाठी अहोरात्र काम करीत असतात. त्यांना हा सन्मान देणे म्हणजे असक्षम महिलांना सक्षम बनविण्यासाठी त्यांच्या कार्याला प्रोहोत्सान देणे आहे.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना प्रगती पाटील ह्यांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आभार व्यक्त केले व ह्या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून ह्या पुढे सुद्धा समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली.याच प्रसंगी महिलांसाठी गाणे व नृत्याचा सुद्धा कार्यक्रम पर्यटन महामंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक दिनेश कांबळे या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शेरकी, मितेश रामटेके, स्वप्नील मांडगे, वैशाली भांडारकर, प्रतिभा बोदेले, पूजा कांबळे, कुणाल कराळे, विवेक बोरकर, दीपक बोदेले, आशिष दखने यांनी परिश्रम घेतले.
संचालन अनिता मेश्राम यांनी केले व आभार वैशाली भांडारकर यांनी व्यक्त केले.