इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेसाठी मनपाचा ‘नागपूर निती’ संघ

– ग्रीन व्हिजीलचे मेहुल कोसूरकर असणार कर्णधार

– स्वच्छतेसाठी १७ सप्टेंबरला स्वच्छता रॅली

नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने देशपातळीवर ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये ‘नागपूर निती’ या नावाने नागपूर महानगरपालिका सहभागी होणार आहे. त्याअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत नागपूरात विविध उप्रक्रम राबविल्या जाणार असून, या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (१४ सप्टेंबर) शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची बैठक पार पडली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह झोनल अधिकारी व स्वयंसेवी संस्थाने पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला आठ व स्वच्छ भारत अभियान -2 ला एक वर्ष झाले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत अठराशे हुन अधिक शहर सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या संघाला नागपूर नीती असे नाव देण्यात आले असून, ग्रीन व्हिजील संस्थेचे मेहुल कोसुरकर कर्णधार असणार आहे. या स्पर्धे अंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे शनिवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता स्वच्छता रॅली काढल्या जाणार आहे. ही स्वच्छता रॅली अमरावती रोड स्थित विद्यापीठ चौकापासून ते अंबाझरी स्थित विवेकानंद स्मारक ते दीक्षाभूमी अशी असणार आहे. रॅली दरम्यान नागरिक आपल्या श्रमदानाने मार्ग स्वच्छ करीत चालतील. यासाठी युवावर्ग, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, याकरिता नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवर नावनोंदणी करावी असे आवाहन  जोशी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनेक ठिकाणी झाडांची पडझड ; मनपाद्वारे बचाव कार्य

Fri Sep 16 , 2022
समस्या निवारणासाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत नागपूर :-  शहरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे, नागरीकांना काही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे नागपूरकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, शहरात पाणी जमा होणे, झाड पडणे अशा अनेक तक्रारी मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होत आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींवर अग्निशमन विभागाद्वारे तात्काळ दखल घेत कार्यवाही केल्या जात आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!