४८ व्या पुष्प प्रदर्शनात नागपूर मेट्रोला मिळाले एकूण १३ पुरस्कार

नागपूर: मुख्य अभियंते तसेच सहायक संचालक, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभागाच्या उपवन आणि उद्याने शाखे तर्फे आयोजित ४८ व्या पुष्प प्रदर्शनात महा मेट्रो नागपूरला विविध श्रेणीत मिळून तब्बल १३ पुरस्कार प्राप्त झालेत. असे पुरस्कार मिळण्याचा हा पहिला प्रसंग नसून, या आधी देखील अनेकदा महा मेट्रो नागपूरला हे पुरस्कार प्राप्त झाले आहे. ज्या श्रेणीत महा मेट्रोला पुरस्कार प्राप्त झाले त्यात ऑर्नामेंटल प्लांट्स, हँगिंग बास्केट, फ्लॉवरिंग प्लांट्स, अँथुरिअम तसेच अन्य श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. या शिवाय टेरेस गार्डन श्रेणीत प्रथम आणि गेस्ट हाऊस श्रेणीत द्वितीय पुरस्कार महा मेट्रोला मिळाले आहे. प्रदशनात भाग घेतलेल्या विविध शासकीय, निम-शासकीय तसेच खाजगी संस्थांनी भाग घेतला होता. मेट्रोला विविध श्रेणीत एकूण ४ प्रथम आणि ९ द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेत.

या आधी नागपूर मेट्रो प्रकल्पाला 2019, 2018, 2017 वर्षी देखील पुरस्कार मिळाले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com