नागपूर :- दिनांक २८.०८.२०२४ रोजी नागपूर शहर अंतर्गत वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण २,८३८ वाहन चालकांवर कारवाई केली, एकूण रू. ३,२५,१५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.