नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २६.०३.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केस, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०३ असे एकुण ०४ केसेस मध्ये एकुण ११ ईसमावर कारवाई करून रू. १२,१२,८८७/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०५ केसमध्ये एकुण १९ ईसमावर कारवाई करून रू. १.९६,३९०/- या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.५९३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,९२,२५०/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना अटक

Thu Mar 28 , 2024
नागपूर :- दिनांक २६.०३.२०२४ चे २२.३० वा. ते २३.५५ वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा वाहन चोरी व घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नविन हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून घोरपड गावाकडुन शिरपूर गावाकडे जाणाऱ्या रोड दरम्यान असलेल्या नहर जवळ रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी क. १) आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया, वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights