दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना अटक

नागपूर :- दिनांक २६.०३.२०२४ चे २२.३० वा. ते २३.५५ वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा वाहन चोरी व घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नविन हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून घोरपड गावाकडुन शिरपूर गावाकडे जाणाऱ्या रोड दरम्यान असलेल्या नहर जवळ रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी क. १) आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया, वय २९ वर्ष, रा. जे.एन हॉस्पीटल जवळ, क्वॉर्टर नं. एच/१३, कांद्री कन्हान जि. नागपूर ह.मु डुप्लेक्स नं. ९, सिनीका विहार रनाव्य रोड, भिलगाव नागपूर २) रजत दिलीप ननेट वय २७ वर्ष ३) कार्तिक राम ननेट वय २७ वर्ष दोन्ही रा. मेकोसाबाग, गौतम नगर, बुध्द विहार जवळ, जरीपटका, नागपूर ४) अब्दुल ताज वल्द अब्दुल अजीज वय ३६ वर्ष रा. चितरंजन नगर, कामठी, नागपूर हे आपले ताब्यात प्राणघातक शस्त्र घेवुन दरोडा टाकण्याचे तयारीत असताना समक्ष मिळुन आले, तसेच, त्यांचा एक साथिदार पाहिजे आरोपी क. ५) रमाकांत नावाचा ईसम रा. यशोधरानगर, नागपूर हा अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला. आरोपींचे ताब्यातुन तिन चाकु, एक लोखंडी तलवार, मिरची पावडर, दोरी, चार मोबाईल फोन व एक स्वीफ्ट कार क. एम.एच ४० बोई ८५१० असा एकुण अंदाजे ५,६६,१५०/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपींचे हे कृत्य कलम ३९९, ४०२ भा.दं.वि., सहकलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १३५. म. पो.का. अन्वये गुन्हा होत असल्याने आरोपी क. १ ते ४ व जप्त मुद्देमाल यांना पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे नविन कामठी यांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा, पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, सपोनि मयुर बौरसिया, पोउपनि अनिल इंगोले, पोहवा दिपक रेठे, रवि अहीर, श्रीकांत उईके, प्रशांत गभने, नापोअ. प्रविण रोडे, विलास कोकाटे, पंकज हेडाऊ, पोअं. राहुल कुसराम, सुधिर पवार, अभय होणे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार मारणाऱ्या आरोपीस अटक

Thu Mar 28 , 2024
नागपूर :- दिनांक २६.०३.२०२४ चे १६.४५ वा. चे सुमारास, फिर्यादी घनश्याम बळीराम आडे वय ५१ वर्ष रा. प्लॉट नं. १२१/ए, श्रीपुर्णा ले-आउट, साई नगर दाभा, नागपूर यांचा मुलगा नामे लिखीत उर्फ लक्की घनश्याम आहे वय २८ वर्ष हा व आरोपी सागर उर्फ आरूष गौतम घोष वय २६ वर्ष रा. तवक्कल ले-आउट, मदिना मस्जिद जवळ, वाडी, नागपूर असे पोलीस ठाणे वाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com