सौंदर्यीकरण व रोषणाईने उजळले नागपूर शहर, जी-२० शिखर परिषद : नागरी संस्थांच्या बैठकीसाठी नागपूर शहर सज्ज

नागपूर :- जी-२० शिखर परिषदेच्या नागरी संस्था अर्थात सी-२० बैठकांसाठी नागपूर शहर पूर्णत: सज्ज झाले आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात सर्वत्र सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. चौकाचौकांमध्ये करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने नागपूर शहर उजळून निघाले आहे.जी-२० शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळणे ही प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. मात्र यासोबतच नागपूरकर म्हणून प्रत्येक शहरवासीयांना गर्व वाटावा अशी बाब या शिखर परिषदेच्या माध्यमातून घडते आहे. नागपूर शहरामध्ये जी-२० शिखर परिषदेचा एक भाग म्हणून नागरी संस्थांच्या बैठक होणार आहेत. सिव्हिल-२० अर्थात सी-२० च्या बैठकांसाठी मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आलेली आवश्यक ती सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

येत्या २० ते २२ मार्च दरम्यान शहरात जगातील जी-२० शिखर परिषदेचे सदस्य असलेले देश आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस शहरातील वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे या बैठका चालतील. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मनपा प्रशासनाद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. वर्धा मार्गावर मध्यवर्ती कारागृहापुढील मार्ग अर्बन डिझाईन सेलच्या माध्यमातून विकसीत करण्यात आलेले आहे. याशिवाय शहरातील विविध चौकांमध्ये नागपूर शहराची संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे आकर्षक देखावे साकारण्यात आलेले आहेत.

शहरातील सौंदर्यीकरण कार्याची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता.16) विविध ठिकाणी भेट दिली. वेगवेगळया चौकांमध्ये करण्यात आलेली सजावट, उभारण्यात आलेले देखावे, कारंजे आदींची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना त्यांनी नोंदविल्या. यावेळी मनपाचे विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जगाच्या कानाकोप-यातून नागपूर शहरात येणा-या पाहुण्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूर शहराची संस्कृती आणि परंपरेनुसार स्वागत करण्यात येईल. याशिवाय या पाहुण्यांच्या जेवणाचा बेतही नागपुरी, वैदर्भीय आणि व-हाडी ठेवण्यात आलेला आहे.

सौंदर्यीकरण कार्य आणि विद्युत बसेसचे लोकार्पण व पीएमएवाय प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी

नागपूर महानगरपालिकेद्वारे रविवारी १९ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता कामठी रोडवरील मौजा वांजरा, पिवळी नदी जवळ मनपाद्वारे निर्मित प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे भूमिपूजन आणि सायंकाळी ५ वाजता संविधान चौक येथे नागपूर स्मार्ट सिटीद्वारे मनपाला प्रदान करण्यात आलेल्या वातानुकूलीत विद्युत बसेसचे लोकार्पण केंद्रीय परिवहन, महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.

याशिवाय मनपाद्वारे अजनी क्लॉक टॉवरचे नूतनीकरण, सौंदर्यीकरण यासोबतच अजनी चौक परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे. तसेच जयप्रकाश नगर चौक येथे रंगीत कारंजे, आधुनिक शिल्पकृती उभारून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. रविवारी १९ मार्च रोजी केंद्रीय परिवहन, महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रात्री ८ वाजता अजनी आणि ८.३० वाजता जयप्रकाश नगर येथील कार्याचे लोकार्पण होईल.

उपरोक्त चारही समारंभाला विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर अडबाले, डॉ. नितीन राउत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची उपस्थिती असेल.

उपरोक्त समारंभांना जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आम आदमी पार्टी, उत्तर नागपूर कडून ocw विरोधात मडका फोडो आंदोलन

Sat Mar 18 , 2023
नागपुर :- आज दिनांक 17/03/2023 ला आम आदमी पार्टी, प्रभाग 8, उत्तर नागपूर द्वारे देशमुख ले-आऊट, नवी मंगळवारी या परिसरात तीन महिन्यापासून पानी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे झोनल अधिकारी, ओसीडब्लू कार्यालयावर स्थानीय नागरिकांसह मडका फोडो आंदोलन करण्यात आले. स्थानीय नागरिक व आम आदमी पार्टी कडून गेल्या तीन महिन्यात अनेक वेळा ocw झोनल अधिकारी, यांना वारंवार निवेदन देण्यात आले तरी त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com