देवी विसर्जन सोहळ्यास मनपा सज्ज  

चंद्रपूर :- शहरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या देवी विसर्जन सोहळ्यास चंद्रपूर महानगरपालिका सज्ज असुन विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने मनपाची शहर नियंत्रण समिती कार्यरत आहे.

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अधिकारी कर्मचारी असुन विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने ७ कृत्रीम कुंडांची उभारणी करण्यात आली आहे. ईरई नदीवर विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाची चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन अँब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात येत आहे.यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालाय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन विसर्जनप्रसंगी आवश्यक त्या साधने उपलब्ध केली गेली आहेत.

स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता केली गेली आह. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.

नवरात्रात लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. यंदा २२३ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन अर्ज सादर केला होता. महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा देवी विसर्जन सोहळा हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

कृत्रिम तलाव स्थळ – १) झोन क्र.१(कार्यालय) संजय मार्केट 1 ,२) दाताळा रोड 1 , ३) रामाळा तलाव 2 , ४) गांधी चौक 1 , ५) झोन २ ब महाकाली प्राथमिक शाळा 1, ६) झोन क्र.३ कार्यालय 1 येथे कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आलेली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हद्दपार आरोपी विजय उर्फ टायसन डोंगरेस अटक 

Thu Oct 6 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी रहिवासी सराईत गुन्हेगार विजय उर्फ टायसन डोंगरे वय 44 वर्षे ला डीसीपी सारंग आव्हाड यांनी एक महिन्यांपूर्वी 2 सप्टेंबर ला तीन महिन्यासाठी कामठीतुन हद्दपार केले होते मात्र सदर हद्दपार आरोपी हा सदर आदेशाचे उल्लंघन करून चंद्रमनी नगर परिसरातील रेल्वे लाईन जवळ फिरकत असल्याने सदर आरोपीस ताब्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com