‘जीबीएस’बाबत मनपाचा सतर्कतेच्या इशारा

– शहरातील सर्व रुग्णालयांना दिशानिर्देश जारी : घाबरू नका, काळजी घ्या

नागपूर :- पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आल्यानंतर नागपूर शहरात देखील सतर्कतेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील सर्व रुग्णालयांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत.

पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व रुग्णालयांना संशयीत आणि बाधित रुग्णांची योग्य नोंद घेउन ती माहिती मनपा आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.

जीबीएस हा आजार नवा नाही. उपचारानंतर त्यातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो, पण काहींना दीर्घकाळ त्रास जाणवू शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. चालण्यास त्रास, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, हातापायांची ताकद कमी होणे, डायरिया, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे यासह इतर काही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व आरोग्य केंद्रांमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांना अशा प्रकारचे रुग्ण आढळून आल्यास नागपूर महानगरपालिकेला माहिती देण्याची सूचना, डॉ. दीपक सेलोकर यांनी केली आहे.

अशी आहेत लक्षणे

– चालण्यास त्रास

– अशक्तपणा

– हातापायांना मुंग्या येणे

– हातापायांची ताकद कमी होणे

– डायरिया

– बोलण्यास किंवा अन्न

– गिळण्यास त्रास

– श्वास घेण्यास त्रास होणे

अशी घ्या काळजी

– दूषित पाणी पिऊ नये, उकळून पाणी प्यावे.

– अन्न ताजे आणि स्वच्छ असावे.

– शिजलेले अन्न आणि शिळे अन्न एकत्रित ठेवू नये.

– वारंवार हात धुवावेत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तांड्यांना गावठाण व ग्रामपंचायत घोषित करण्याची कार्यवाही गतीने करा - पालकमंत्री संजय राठोड

Sat Feb 1 , 2025
– पालकमंत्र्यांकडून तांडा समृध्दी योजनेचा आढावा – तांड्यांसाठी १५३ कामे व १५ कोटी रुपये मंजूर यवतमाळ :- बंजारा समाजाचे वास्तव्य असलेल्या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण व तांड्यांना महसूली गाव, ग्रामपंचायत घोषित करण्याची कारवाई गतीने करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावे, अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!