मनपा, दपूम रेल्वेचा विजय, खासदार क्रीडा महोत्सव : लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिका आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करीत विजय मिळविला.

डब्ल्यूसीएल मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये बुधवारी (ता.17) मनपा संघाची लढत एमएसआरटीसी संघाशी झाली. या सामन्यात मनपा संघाने 7 गड्यांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणा-या एमएसआरटीसी संघाने निर्धारित 10 षटकांमध्ये 4 बाद 84 धावा काढल्या. संघाकडून इमरान शेखने सर्वाधिक 42 धावा काढल्या. मनपा संघाच्या नीरजने 1 गडी बाद केला इतर अन्य गडी धावबाद ठरले. मनपा संघाने फलंदाजी करताना 7.3 षटकांमध्ये 3 बाद 83 धावांचे लक्ष गाठले व सामन्यात विजय मिळविला. संघाकडून मनीषने सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले.

दुस-या सामन्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संघाने नागपूर मेट्रो संघाचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करीत रेल्वे संघाने निर्धारित 10 षटकांमध्ये 6 बाद 91 धावांचे डोंगर उभारले. संघाकडून चंद्रशेखरने सर्वाधिक 26 धावा काढल्या. मेट्रोच्या स्नेहल तांबे ने 2 गडी बाद केले. विजयी लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेला नागपूर मेट्रो संघ निर्धारित 10 षटकांमध्ये 6 बाद 84 धावाच करू शकला. संघाकडून नितीन गौरने 36 धावांचे योगदान दिले. रेल्वे संघाच्या लोकेश आणि योगेश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आव्हाडांनी न्याय व्यवस्थेच्या निर्णयाचे शहाणपण सांगू नये - जयदीप कवाडे

Thu Jan 18 , 2024
– प्रक्षोभक वक्तव्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा निषेध मुंबई/नागपुर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे जगात नावलौकिक असलेली न्यायव्यस्थता तयार केली आहे. आज जगभरातील शेकडो देश भारताच्या संविधानाला आत्मसात करीत आहेत आणि आपल्या देशात लोकशाही टिकविण्याचे काम करीत आहे. अशातच भारताच्या न्याय व्यवस्थेत निकालात जातीयतेचा गंध येत असल्याची गरळ नागपुरात जितेंद्र आव्हाडांनी ओकली. मुळात न्याय व्यवस्थेतील निकाल आव्हांडा हिताशी लागत नसल्यानेच प्रक्षोभक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com