संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नागरिकांनी घ्यावी काळजी, तालुका प्रशासनाने कराव्या उपाययोजना
कामठी :- सुरू असलेल्या पावसाळ्याच्या ऋतूत कधी ऊन तर कधी पाऊस या बदलत्या वातावरणात कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू व मलेरियाचा धोका घोंगावत आहेत.नुकतेच येरखेडा येथील एका 34 वर्षोय तरुणाचा डेंग्यूने तडकाफडकी मृत्यू झाला असून कित्येक रुग्ण डेंग्यूग्रस्त आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डास निर्मूलनासाठी तालुका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवकाकडून उपाययोजना रणविण्याची नितांत गरज आहे.
घराशेजारी परिसरात घाण पाणी,अनेक दिवसापासुन पाणी साचून असलेले डबके, घरातील ओला कचरा,घरात असलेले भंगार साहित्य, पाण्याची डबकी,फ्रिजच्यामागच्या बाजूला असलेला पाण्याचा ट्रे ठिकठिकाणी डास अळ्यासाठी पोषक असतात या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे घर व परिसरात स्वछता ठेवावी. कामठी नगर परिषद कडून शहरी भाग परिसरात ब्लिचिंग पावडर सह धूळ फवारणी करणे अपेक्षित आहे मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासन याबाबत गंभोर्यांची भूमिका घेत नसल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीत घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. याठिकाणी उत्पन्न होणाऱ्या डासांपासून संपूर्ण शहरात डेंग्यू,मलेरिया फ्लू यासारखे जीवघेणे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासनाने अशा उपाययोकजणासाठी वेळीच पावले उचलने गरजेचे आहे.नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे सामान्य जनतेकडे कोणताच लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही.शासनाकडून लाखो रुपयांचा निधी प्राप्त होत असतानाही शहरात सफाई होत नाही,धूळ फवारणी होत नाही ,कामठी नगर परिषद प्रशासनाचा मनमानी कारभार कायम आहे तेव्हा शहरवासीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी .