आयुष्मान आरोग्य मंदिराचे १ लक्ष पेक्षा जास्त नागरिकांनी घेतले लाभ

– ४४५३ गरोदर मातांची सुद्धा तपासणी : आणखी १४ आरोग्य मंदिर सुरू होणार

नागपूर :-  नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे संचालित करण्यात येणारे आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्य वर्धिनी केंद्र) चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मदत आहे.आता पर्यंत १,१८,६३० लाभार्थ्यांची बाह्यरुग्ण विभागात निशुल्क तपासणी झाली असून ४४५३ गरोदर मातांची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य मंदिरात सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध करण्यात आलेली आहे.

सन २०२१-२२ या वर्षातील 15th Finance अंतर्गत नागपूर महानगरपालिका करिता एकूण २० U-HWC मंजूर करण्यात आलेले होते.तसेच सन २०२२-२३ करिता ९३ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्य वर्धिनी केंद्र/U-HWC) मंजूर करण्यात आलेले आहेत. असे एकूण ११३ केंद्र मंजूर आहेत. आज पर्यंत ३६ आयुष्मान आरोग्य मंदिर (३२ शासकीय ईमारत व ४ भाडे तत्वावरील) कार्यान्वित आहेत व ४ केंद्र (३ शासकीय ईमारत व १ भाडे तत्वावरील) नव्याने सुरु करण्यात आलेले आहेत असे एकूण ४० आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित आहेत. याव्यतिरिक्त आणखी १४ (२ शासकीय ईमारत व १२ भाडे तत्वावरील)आयुष्मान आरोग्य मंदिर यांचे डागडुजी सुरु असून येत्या काळात ते लोक सेवेकरिता सज्ज असतील. याव्यतिरिक्त ८ महानगरपालिका मालकीचे ईमारती याकरिता प्रस्तावित असून दुरुस्तीकरण पूर्ण होवून येत्या काळात त्या आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणून कार्यान्वित होतील.

आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित करणेबाबत आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांचे नेतृत्वात आणि अति.आयुक्त(शहर) आंचल गोयल सूद यांचे मार्गदर्शनात आरोग्य विभाग कामकाज करीत आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिर सामान्य नागरिकांकरिता लाभदायक ठरतील व आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यात येतील असे प्रतिपादन आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मा.अति.आयुक्त(शहर) आंचल गोयल सूद यांनी आवाहन केले आहे. याकरिता डॉ.दीपक सेलोकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी,डॉ नरेंद्र बहिरवार अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे चमू कार्य करीत आहेत.

उपलब्ध सेवा :- सर्व सेवा मोफत आहेत. नोंदणी शुल्क सुद्धा नाही.

१) गर्भधारणा आणि बाळंतपणाची काळजी .

२) नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा (लसीकरण)

३) बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा.

४) कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक सेवा आणि इतर पुनरुत्पादक आरोग्य सेवा

५) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसह संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन

६) सामान्य संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन आणि तीव्र सामान्य आजार आणि किरकोळ आजारांसाठी बाह्यरुग्ण तपासणी .

७) असंसर्गजन्य रोगांचे स्क्रीनिंग, प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन

८) सामान्य नेत्ररोग आणि ENT समस्यांसाठी तपासणी

९) मूलभूत मौखिक आरोग्य सेवा

१०) वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा

११) आपत्कालीन वैद्यकीय सेवा

१२) मानसिक आरोग्याच्या आजारांचे स्क्रीनिंग आणि मूलभूत व्यवस्थापन

१३) योगा

मनुष्यबळ :-

मार्गदर्शक सूचना नुसार पदभरती महानगरपालिका मार्फत करण्यात येत आहे.

१) वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष) व स्टाफ नर्स यांचे नियुक्ती कार्यान्वित केंद्रांमध्ये करण्यात आलेली आहे.

२) परिचर व अटेंडंट हे बाह्यश्रोत एजेन्सी द्वारे करणेत येत आहे.

औषधी :-

१) आरोग्य विभाग द्वारे पुरविण्यात येत आहे. (Analgesics, Antipyretics, Anti-biotics, Anti-hypertensive, Anti-diabetic etc)

रक्त तपासणी :-

 

१) आवश्यक रक्त तपासणी हि HLL मार्फत करण्यात येईल. (CBC, Lipid Profile, LFT, KFT, Biochemistry etc.)

टप्प्या टप्प्याने आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. माता तसेच नवजात व बालके यांचे लसीकरण केले जाते (BCG,Oral Polio, IPV, PCV, Pentavalent, DTP, TD, MR, Rotavirus etc).

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Finnish Parliamentary delegation meets Maha Governor

Fri Sep 13 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor C.P.Radhakrishnan on Thursday (12 Sept) interacted with members of the Finnish Parliamentary delegation of Commerce Committee led by Sakari Puisto at Raj Bhavan, Mumbai. Vice Chancellors of MU, SPPU, BAMU and MSSU were present. Consul General of Finland in Mumbai Erik af Hällström was also present. Both sides appreciated the significance of meeting on the 75th […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!