सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक ०८/०८/२०२४ रोजी ११/३० वा. ते १३.०० वाजता पर्यंत अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे अध्यक्षतेखाली व रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सावनेर यांचे उपस्थितीमध्ये सावनेर तालुक्यामधील पोलीस पाटलांची मासिक बैठक घेण्यात आली. वैठकीमध्ये सर्व पोलीस पाटील यांचे कडून गावातील हालचाली बावत माहिती घेऊन सतर्क राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.