नागपूर :- नोकरीबरोबरच किर्तन-भजन आणि सप्तखंजेरीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, वृक्षारोपण यांसारख्या विषयांवर सामाजिक जागृतीचे कार्य अविरतपणे करित असल्याबद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फ़े महावितरणमध्ये कार्यरत मोहनदास आनरावजी चोरे यांना ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे नुकत्याच आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, मुंबईचे पालकमंत्री व शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळमकर, आमदार सदा सरवणकर, कामगार विभाग सचिव विनिता वेद सिंघल, मुंबईचे जिल्हाधीकारी राजेंद्र क्षीरसागर, कामगार आयुक्त सतिश देशमुख, कामणार कल्याण आयुक्त रविरान इळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत सिव्हील लाईन्स विभागातील, धरमपेठ उपकेन्द्र येथे वरिष्ठ यंत्रालक म्हणून कार्यरत असलेले मोहनदास चोरे हे आपल्या नोकरीबरोबरच किर्तन-भजन या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या व्यसनमुक्ती, संघटन कौशल्य, वृक्षारोपण या विषयांवर जनजागृती, कामगार जागृतीचे काम करतात. आजपर्यंत शेकडो लोकांना आपल्या प्रबोधनातून त्यांनी विज वितरण कंपनी तसेच इतर कामगारांना व्यसनमुक्त केले आहे. 2013 मध्ये त्यांना कंपनीतर्फे गुणवंत कामगार (उत्कृष्ठ) यंत्र चालक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हाच वसा घेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा प्रतिष्ठित ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार’ (2021-22) साठिचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांचे सोबत दिनेश वहोकर (खैरगावकर), मुंबई हे सुध्दा उपस्थित होते. मोहनदास चोरे हे महावितरण अंतर्गत तांत्रिक कामगार युनियन्चे प्रादेशिक सचिव म्हणून काम पाहतात. या पुरस्काराबद्दल प्रकाश निकम, गुरुदेव सेवा मंडळाचे गंगाधरराव घोडमारे, तांत्रीक कामगार युनियनचे सरचिटणीस प्रभाकरराव लहाने पाटील, श्री गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वरदादा रक्षक, देविदास लाखे, सप्तखंजेरीवादक अभियंता भाऊसाहेब थुटे आणि महावितरणचे अधिकारी, अभियंते व सहकर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.