नागपूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या विद्यमाने नागपूर येथे शेळी कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 4 ते 8 जानेवारी 2022 या दरम्यान केले आहे. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशिक्षणार्थींनी आधुनिक शेळी व कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेऊन तसेच स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजक बाबींची सविस्तर माहिती घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करावा असा आहे.
सदर कार्यक्रमाअंतर्गत शेळीच्या कोंबडीच्या व गाई-म्हशीच्या जातीची निवड त्यांच्यावर होणारे रोग लसीकरण शेडचे बांधकाम पोषक तत्वे व चारा व्यवस्थापन विमा व्यवस्थापन बाजारपेठ पाहणी तसेच प्रकल्प भेट इत्यादी विषयावर प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार कसा सुरु करावा. कर्ज विषयक योजनांची माहिती, विक्री व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार करणे आदी बाबत सविस्तर माहिती देण्यात येईल
तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी एम.सी.इ.डी. उद्योग भवन, पहिला माळा सिव्हिल लाईन नागपूर 440001 येथे कार्यक्रम सहाय्यक कुमारी अश्विनी शेंडे 74 98769824 किंवा प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुलकर्णी 9403078760 यांना दिनांक 3 जानेवारी 2022 पूर्वी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे