गडचिरोली :- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज चार्मोशी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरात भेट देऊन श्री महादेवाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी महाशिवरात्री यात्रेसाठी मार्कंडा येथे आलेल्या भाविकांशी मंत्री श्री आत्राम यांनी संवाद साधला तसेच महाप्रसादाचे वितरणही केले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी मंदिर प्रशासन समितीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.