पोलिसांनी दिले सहा गोवंशीय जनावरांना जीवनदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साई मंदिर समोरून कामठी च्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या टाटा सुमोचा नवीन कामठी पोलिसांनी पाठलाग करीत टाटा सुमोवर यशस्वीरीत्या धाड घालून कत्तलीसाठी जात असलेले टाटा सुमोत कोंबून निर्दयतेने बांधून असलेले सहा गोवंश जनावरे ताब्यात घेत जप्त जनावरे भंडारा च्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कामगिरी नविन कामठी पोलिसांनी सकाळी 7 वाजता केली असून या धाडीतून जप्त सहा गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 20 हजार रुपये व जप्त टाटा सुमो क्र एम एच 40 ए वाय 1744 किमती 4 लक्ष रुपये असा एकूण 5 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.

इतक्या आरोपीचे नाव शेख इर्शाद शेख मुमताज वय 40 वर्षे रा मदन चौक,कामठी,मुख्तार उर्फ मोनू कुरेशी वय 23 वर्षे रा भाजी मंडी कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम,एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ व वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुशील कोडापे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लिहिगाव च्या मालू राईस मिल ला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

Fri Jun 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील मालू राईस मिलला शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याची घटना दुपारी 12 दरम्यान घडली मात्र वेळीच पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन वाहन पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.सुदैवाने जीवितहानी टळली. स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव येथे मालू मिलच्या दुसऱ्या माळ्यापर्यंत मशीनचे ब्रान सेक्शन असून तेथून धानाचे कव्हर पास होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com