अन्न व औषध प्रशासन विभागाचा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला आढावा

मुंबई :- अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज मंत्रालयात घेतला. विभागातील प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश मंत्री आत्राम यांनी यावेळी दिले.

वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील, सहआयुक्त रावसाहेब समुद्रे, सहआयुक्त (औषधे) डी. आर. गहाणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, र.शी.राठोड, उपसचिव वैशाली सुळे, अवर सचिव हेमंत महाजन आदी उपस्थित होते.

मंत्री आत्राम म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागातील पदभरती टप्याटप्याने करण्यात यावी. मागील वर्षभरात भेसळयुक्त अन्नपदार्थाची दखल घेऊन तेथे छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे. यामुळे भेसळ करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. तालुकास्तरावर प्रशासनाच्या अन्न विभागासाठी अधिकारी व कर्मचारी यांची पदे वाढवण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

लिपिक टंकलेखक व नमुना सहाय्यक ही व्यपगत घोषित करण्यात आलेली पदे पुनर्जीवित करण्याबाबत कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासन बाह्य संपर्क व संवाद योजनेस मान्यता व निधी मिळण्याबाबत प्रस्तावावर मान्यता घेणे, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळा चालवण्यासाठी पीपीपी मॉडेल राबविण्याबाबत कार्यवाही तातडीने करावी. प्रशासनाच्या हेल्पलाईनसाठी महाआयटी खासगी यंत्रणेकडून तांत्रिक सोयी- सुविधा-सह नियंत्रण कक्षात मनुष्यबळ उपलब्ध करावे. प्रशासनाच्या गुप्त सेवा निधीमध्ये वाढ करणे. बाह्ययंत्रणेद्वारे पदभरती, अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकटीकरण करणे. गडचिरोली तसेच इतर जिल्ह्याच्या कार्यालयाकरिता इमारत बांधकामाची सद्य:स्थिती, अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिरं अशा विविध विषयांचा आढावा मंत्री आत्राम यांनी यावेळी घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागामार्फत बनावट विक्री बिलांच्या संदर्भात दोन व्यक्तिंना अटक

Mon Oct 9 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटीच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाच्या 27.७४ कोटीच्या कर महसूलाची हानी करणा-या व्यक्तींना अटक केली असल्याचे अन्वेषण विभागाचे राज्यकर सहआयुक्त, यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. मे. श्री समस्ता ट्रेडिंग प्रा.लि. व शरद क्लिअरींग अँड फॉरवरडिंग प्रा. लि. या व्यापा-यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com