उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींशी मंत्री चंद्रकांत पाटील साधणार संवाद महिती देण्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन 

मुंबई :- राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या गुरुवार दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते १२ यावळेत ऑनलाइन वेबिनार होणार आहे. हा कार्यक्रम http://www.parthlive.com लिंकवरून (यू टयूब) वर सुध्दा थेट (Live) प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाकरिता राज्यातून जवळपास ५ हजार शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनी, पालक व संस्थांचे प्रतिनिधी ऑनलाइन थेट प्रक्षेपणाचा लाभ घेणार आहेत.

राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खासगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवगांतील, सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नूतनीकरण केलेल्या) मुलींना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ, कुटुंबाचे आर्थोक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,

अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या), आणि महिला व बाल विकास विभागाच्या दि.६ एप्रिल २०२३ नुसार “संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुध्दा शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत आहे.अशा सर्व योजनांची माहिती या वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सत्कार

Thu Jul 25 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १६ (ड) तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी २४ जुलै रोजी माजी महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष अतिथी म्हणून सराफ कोचिंग क्लासेसच्या सुषमा सराफ, पाटील कोचिंग क्लासेसचे अनिकेत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!