उमरखेड खंड एकमधील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती

यवतमाळ :- पृथ्वी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या नोंदीनुसार दिनांक २१ मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ८ मिनीटांनी व ६ वाजून १९ मिनीटांनी अनुक्रमे ४.५ रिस्टर स्केल व ३.६ रिस्टर स्केल भुकंपाची नोंद झाली आहे.

लुका स्तरावरील प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागात सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त असून कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस विभागातील तो विभीशन कोण?

Fri Mar 22 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यातील नेरी तसेच बिना रेती घाटाच्या निर्धारित डेपो मधून दररोज एका रॉयल्टी वर चाळीस च्या वर ट्रक ने वाळू वाहतूक होत असून नदीतून बिनधास्तपणे अवैध उत्खनन सुरू आहे.ज्यामुळे लाखो, कोटी रुपयांची रेती तस्करांच्या घशात जात असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे महसूल प्रशासनाचा महसूल बुडत आहे तर रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे.तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights