– व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना यवतमाळचा उपक्रम
यवतमाळ :- देशात नंबर वन असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना यवतमाळ यांच्या वतीने 11 ऑगस्ट रोज रविवार रोजी जिल्हा परिषद सहकार भवन यवतमाळ येथे व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक किट सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यवतमाळ येथील जिल्हा परिषद सहकार भवन येथे गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष वर्षा निकम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख सागर पुरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ तालुकाध्यक्ष संजय रंगे, ज्येष्ठ पत्रकार रघुवीर सिंग चव्हाण, यवतमाळ जिल्हा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनलकर, सुकांत वंजारी, व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यवतमाळ व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सोळाही तालुक्यातील पत्रकारांचे गुणवंत पाल्य व गरजू 104 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट, सन्मानपत्र सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले. आभार अरुण बरङे. यांनी मानले. कार्यक्रमाला उत्कृष्ट तालुका अध्यक्ष पुरस्कार प्राप्त समाधान केवटे अतिक यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष व सर्व सदस्य विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.