अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 12 वी पाठोपाठ इयत्ता 10 वीचाही निकाल जाहीर केला आहे.यात तिरोडा येथील मेरिटोरियस पब्लिक स्कूलचा विद्यार्थी मंथन विनय खेताडे याने 99.4 टक्के (479) गुण पटकावून गोंदिया जिल्ह्यातून प्रथम तर विदर्भ मधून दूसरा येण्याचा मान मिळविला.
शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यातून नावारूपाला आलेल्या मेरिटोरियस पब्लिक शाळेचा निकाल दरवर्षी उत्कृष्ट लागतो. यावर्षी लागलेल्या दहावीच्या निकालात या शाळेतील 10 विद्यार्थी 85 टक्क्यांपेक्षा अधिक, 14 विद्यार्थी 80 टक्क्यांपेक्षा अधिक तर 15 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचा व आई-वडिलांचा लौकिक वाढविला. तसेच 28 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्रावीण्य सूचित आपल्या नावाची नोंद करून घेतली.
विद्यार्थी मंथन विनय खेताडे याने 99.4 टक्के गुण घेत गोंदिया जिल्ह्यातून अव्वल आल्याने तिरोडा शहर, तिरोडा तालुका व मेरिटोरियस पब्लिक स्कूलचा मानाचा तुरा वाढला आहे. त्यातच याच शाळेतील विद्यार्थी आयुष बडगे 96.2 टक्के, अनन्या तितिरमारे 95.5 टक्के, स्वरूप सिंगणजूडे 90 टक्के व लक्षिता जनबंधू या विद्यार्थिनीने 89.2 टक्के गुण मिळविले.
उल्लेखनीय म्हणजे मेरिटोरियस पब्लिक स्कूलचा CBSE 12 वीचा निकाल सुद्धा उत्कृष्ट लागला. त्यात दिव्या दुबे या विद्यार्थिनीने 94 टक्के गुण, आयुषी पटले हिने 93.6 टक्के गुण व उदित अग्रवाल याने 93.4 टक्के गुण प्राप्त करून शाळेचा लौकिक वाढविला.
मंथनला इंजीनियर व्हायचे आहे. पहिल्या वर्गापासून शिक्षण मेरिटोरियस शाळेतच झाले असुन शिक्षक , प्राचार्य यांच्या मार्गदर्शनमुळे दहावीत गुण घेऊन यशस्वी उत्तीर्ण झाले आहे.
मेरिटोरियस पब्लिक स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश अग्रवाल, रानी अग्रवाल प्राचार्य तुषार येरपुडे, सर्व शिक्षक व शक्षकेतर कर्मचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच मंथन, आयुष,आरुषि, अनन्या च्या पालका सह शाळेत सत्कार केला.