संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पोर्णिमेपर्यंत धर्म प्रचार करणाऱ्या भिक्खूनी एकाच ठिकाणी राहावे कारण बुद्धांच्या आदेशानुसार धर्म प्रचार करणाऱ्या या भिक्खूना विशेषतः पावसाळ्यात अनेक संकटाचा सामना करावा लागत होता तेव्हा एकाच ठिकाणी राहून वाचनास धम्माचे पठण ,अध्ययन करावे व परिसरातील उपासक आणि उपसीकेना धम्म शिकवण द्यावी तसेच ध्यान व ज्ञान म्हणजे बुद्ध आणि शिक्षा आहे असे मौलिक प्रतिपादन ऍड सचिन चांदोरकर यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गत कामठी येथील जुनी खलाशी लाईन स्थित अनागरिक धम्मपाल बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समापन कार्यक्रम प्रसंगी केले.
दरम्यान श्रामनेर भिक्खू संघाच्या पथसंचलनचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर विहारात भन्ते प्रज्ञारखीत तथा भन्ते धम्मबंधु भींमचौक नागपूर द्वारा धम्म वाणी चे पठण करण्यात आले.याप्रसंगी सुगत रामटेके, रजनीताई धोंगडे ,नितीन डोनेकर सह मोठ्या संख्येत उपासक उपसिकागण उपस्थित होते. यानंतर भव्य भोजनदान वितरणाने वर्षावास कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या भोजनदानाचा शेकडो च्या वर उपासकांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र धोगडे, सुरेश गजभिये, आरजु कांबळे, मिथुन चांदोरकर, कुदन चवरे, विशाल माटे, सुनिल गडपायले, रविजय नगरारे, प्रफुल सवाईफुल, गुलाब खोब्रागडे, दिपक डोनेकर, मदन मेश्राम, पकंज रामटेके, प्रमोद रामटेके प्रविण रामटेके, विलास बन्सोड, उदास बन्सोड , लता गणेश सांगोडकर, दिपाली गजभिये, देवांगना गजभिये, प्रज्ञा तांबे, विद्या भिमटे, शेवंता अशोक चांदोरकर, सुधा रंगारी, सीमा रामटेके, अलका तांबे, अमिता चांदोरकर, शारदा कांमळे, अर्पना चांदोरकर, मंजु वांद्रे, स्नेहा चांदोरकर