केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली भन्ते सुरेई ससाई यांची भेट

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) इंदोरा बुद्ध विहार येथे भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेतली. यावेळी भन्ते सुरेई ससाई यांच्या प्रकृतीची ना. गडकरी यांनी आवर्जून चौकशी केली. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेमुळे भन्ते सुरेई ससाई यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी ना. गडकरी यांनी सहकार्य करून वेळोवेळी प्रकृतीची चौकशी देखील केली होती. भन्ते सुरेई ससाई यांनी स्वतः या आठवणींना उजाळा देत ना. गडकरी यांना आशीर्वाद दिले आणि लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या. ना. गडकरी यांनी इंदोरा बुद्ध विहार येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच ज्येष्ठ मेंदूरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध उद्योजक श्री. बसंतलाल शॉ, गुरबक्ष सिंह लांबा यांच्याही निवासस्थानी ना.नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘टिप टिप बरसा पानी’ने श्रोताओं को रिझाया

Sun Mar 24 , 2024
नागपूर :-व्हर्सटाईल सिंगर्स ग्रूपद्वारा होली के उपलक्ष्य में आयोजित ‘टिप टिप बरसा पानी’ इस संगीतमय कार्यक्रम को रसिक श्रोताओं ने सराहा. इसमें सहभागी गायक कलाकारों ने एक से बढकर एक सदाबहार गीत प्रस्तुत करके श्रोताओं को रिझाया. सीताबर्डी स्थित अमृतभवन मे शुक्रवार को हुए इस कार्यक्रम के आयोजक तुषार रंगारी थे. कार्यक्रम में निलेश वैरागडे ने ‘तू इस तरहा मेरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com