संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात काही पांनठेला साहित्य विक्रेते व किराणा दुकानातून आणि इतर छुपे एजंट मार्फत होणारी सुगंधित तंबाकू व अंमली पदार्थाची तस्करी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे सुरू असून येथील काही ठिकाणी गुटख्यातील नकली तंबाखू वापरामुळे नागरिकांचे आणि अल्पवयीन मुले व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून मानवी शरिराला व आरोग्याला घातक असलेले सुगंधित तंबाकू ,गुटखा व अंमली पदार्थाच्या विक्रीकरिता शासनाने बंदी आणली आहे.नियंत्रणा करिता शासनामार्फत प्रशासकीय यंत्रणा सुदधा लावण्यात आलेली आहे.मात्र यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्यामुळे आणि थातुरमातुर कारवाही मुळे कामठी तालुक्यात शहरा बरोबर ग्रामीण भागात सुदधा सुगंधित तंबाकू व अंमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणारे छुपे एजंट सर्रासपणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू करण्यात यशस्वी ठरले आहेत.सुगंधित तंबाकू व नकली तंबाखू आणि अंमली पदार्थच्या सेवनामुळे हजारो नागरिक ,अल्पवयीन मुले व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे आढळून येत आहे.तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी बंदोबस्त लावून दोषींवर कठोर कारवाही करून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी येथील जागरूक नागरिकांनी केली आहे.
@ फाईल फोटो