कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी सतर्क राहणे आवश्यक असून यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंहवैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकरउपसचिव प्रकाश सुरवसे उपस्थित होते.

             देशमुख म्हणाले कीसध्या कोविडचे रुग्ण दररोज वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना सतर्क राहण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी द्याव्यात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी बृहत आराखडा तयार केला जातो. या बृहत आराखड्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात काय सुधारणा करणे आवश्यक करणे याचा अभ्यास केला जातो. विद्यापीठामार्फत सर्वसमावेशक असा जेथे शासकीयखाजगी आणि अभिमत विद्यापीठ एकत्रितपणे राबवू शकतील असा आराखडा असणे आवश्यक आहे, असेही देशमुख म्हणाले.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणारी वर्ग-1 आणि वर्ग-2 साठीची पदभरती करण्यात येत आहे. ही पदभरती पूर्ण झाल्यावर नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी रुजू करण्यात यावेत. तसेच वर्ग-3 भरती ही वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत आणि वर्ग-4 शी पदभरती बाह्यस्त्रोताद्वारे जेथे आवश्यक आहे करण्यात येत आहे या कामांना सुद्धा गती देणे आवश्यक असल्याचे  देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे - मंत्री छगन भुजबळ

Wed Jun 8 , 2022
 मुंबई : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण  करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.          राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ गोंडे ते वडपे आणी वडपे ते ठाणे या रस्त्याची दुरवस्था, वाहतूक कोंडीच्या उपाययोजनांबाबत मंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com