एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०३ आरोपींना अटक, एकूण ८,४५,१००/- रू. चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे हुडकेश्वर हदीत, प्लॉट नं. १२४, पवनपुत्र नगर, उमरेड रोड, बहादुरा फाटा, नागपूर येथे काही ईसम अॅक्टीव्हा गाडीवर फिरत असुन, एम.डी. पावडर बाळगुन आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ३१ एफ.व्ही. ८४२७ या गाडीवरील तिन इसमांना थांबवुन पंचासमक्ष रेड कार्यवाही केली असता, आरोपी १) रोहन सुरेश डाकुलकर, वय २८ वर्षे २) शुभम सुरेश ढाकुलकर, वय ३१ वर्षे, दोन्हीही रा. पवनपुत्र नगर, उमरेड रोड, नागपुर ३) वेदांत विकास ढाकुलकर, वय २४ वर्षे, रा. पर नं. ६६, नेताजी मार्केट, जानकी टॉकीज मागे, धंतोली, नागपुर यांची व वाहनाची हाडती घेतली असता, गाडीचे डिक्कीमध्ये ७१ ग्रॅम ११ मि.ग्रॅम एम.डी. पावडर किंमती ७,११,१००/- रू. ची मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन एम.डी. पावडर, चार मोबाईल फोन, एक अॅक्टीव्हा मोपोड, वजन काटा व रोख २२,५००/-रू, असा एकुण ८.४५,१००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपी है त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे तबरेज आलम उर्फ टिषु वल्द अफरोज आलम, रा. नागपुर याचे मदतीने अवैध अंमली पदार्थ खरेदी, विकी करीत असल्याचे सांगीतले. आरोपींचे कृत्य हे कलम ८ (क), २२(क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपीविरुध्द पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव हुडकेश्वर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. पाहीजे आरोपीचा शोध सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, मपोनि,कविता ईसारकर, पोहवा. सचिन बहीये, लक्ष्मण चौरे, नापोअं. अजय पौनिकर, शेषराव राऊत, अश्विन मांगे, पोअं. कुणाल मसराम, समिर शेख, प्रकाश माथनकर, नितीन वासने व मपोअं. पुनम शेंडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Wed Jun 19 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. २२६. जय जलाराम नगर, वाठोडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी मोहन गोविंदराव बावनकर, वय ६३ वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परीवारासह नातेवाईकाकडे चंद्रपुर येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने फिर्यादीचे घराचे दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने व रोख ८०,०००/- असा एकूण किंमती २,५४,०००/- रू. मुद्देमाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!